(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahnawaz Pradhan Death : 'मिर्झापूर' फेम शाहनवाज प्रधान यांचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत
Shahnawaz Pradhan : अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले आहे.
Shahnawaz Pradhan Passed Away : छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शाहनवाज (Shahnawaz Pradhan Passed Away) यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राजेश तैलंगने शोक व्यक्त करत लिहिलं आहे, "शाहनवाज भावा सलाम!! तू माणूस म्हणून किती चांगला होता आणि अभिनेता म्हणून काय दर्जाचा होता हे मी 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान पाहिलं आहे". 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये शाहनवाज यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. तर राजेश तैलंगदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते.
View this post on Instagram
शाहनवाज प्रधान यांचा जन्म 6 डिसेंबर 1963 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सातवीत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना ते नाटकाच्या ग्रुपसोबत जोडले गेले. शाहनवाज यांनी 1991 साली मनोरंजनसृष्टीत करियर करायचं ठरवलं आणि त्यांनी मुंबई गाठली.
🙏 Om Shanti Shahnawaz Pradhan sir
— Abhishek Bhalerao (@mumbaiactor_) February 17, 2023
Met you once & it was a great feeling…
🔹in Alif Laila as Sindbad
🔸Four characters in Shri Krishna 1) Nand Baba, 2) Shursen, 3)Raja Mahabali & 4) Chanur all in different voices
🔸in Mirzapur as Parshuram Gupta, father of Sweety Gupta & Golu pic.twitter.com/g9SpZbJHiR
शाहनवाज प्रधान यांचा सिनेप्रवास...
शाहनवाज प्रधान यांनी 'जन से जनतंत्र' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'श्री कृष्णा' या लोकप्रिय मालिकेत नंद बाबा ही भूमिका साकारली. या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहेचले. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'देख भाई देख', 'अलिफ लैला', 'ब्योमकेश बख्शी', 'बंधन सात जन्मों का' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच 'प्यार कोई खेल नहीं', 'फँटम' आणि 'रईस' सारख्या सिनेमांत देखील ते झळकले आहेत. तसेच 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये त्यांनी गोलू आणि स्वीटीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
संबंधित बातम्या