Mirzapur 3: मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; तिसऱ्या सिझनचं शूटिंग झालं पूर्ण, अली फजलनं शेअर केली पोस्ट
मिर्झापूर- 3 (Mirzapur 3) चं शूटिंग पूर्ण झाले आहे. आता लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Ali Fazal Mirzapur 3: मिर्झापूर या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. मिर्झापूरमधील गुड्डू पंडित ही भूमिका साकारणारा अभिनेता अली फजलनं (Ali Fazal) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मिर्झापूर- 3 (Mirzapur 3) चं शूटिंग पूर्ण झाले आहे. आता लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मिर्झापूर या वेब सीरिजच्या नावाचा समावेश हिंदी भाषेतील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीत केला जातो. सीरिजमध्ये प्रमुख भूमिका अभिनेता अली फजलनं सोशल मीडियावर मिर्झापूर सीरिजच्या नव्या सिझनच्या शूटिंगबाबत माहिती दिली.
अली फजलची पोस्ट
अली फजलनं सोशल मीडियावर मिर्झापूर वेब सीरिजच्या टीमचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझी प्रिय टीम, तुम्ही मिर्झापूरच्या जगावर केलेल्या प्रेमासाठी आणि मेहनतीबद्दल मी तुमचे आभार मानतो. इतर दोन सीझनप्रमाणेच सीझन 3 हा माझ्यासाठी खूप खास आहे. माझे सह कलाकार, तुम्हाला माहित आहे की तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. आणि तुला माहित आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो. अॅमेझॉनचे देखील आभार.'
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, मिर्झापूर-3 ही सीरिज पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या सीरिजच्या रिलीज डेटची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये आधीच्या दोन सिझनमधील कलाकार काम करणार आहेत की नाही? या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरच प्रेक्षकांना मिळेल.