Mika Singh: प्रायव्हेट आयलँड, 10 घोडे अन् सात बोटींचा मालक मिका सिंह; व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
सध्या मिका त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

Mika Singh: प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. मिका त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी 'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमामध्ये मिकाला आयुष्यभराची जोडीदार मिळाली.आकांक्षा पुरी (Akanksha Puri) ही 'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमाची विजेती ठरली. सध्या मिका त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. मिकानं नुकतेच एक प्रायव्हेट आयलँड खरेदी केलं आहे.
मिकानं एक प्रायव्हेट आयलँड खरेदी केलं असून तो दहा घोडे अन् सात बोटींचा देखील मालक आहे. नुकताच मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मिका हा बोट चालवताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी मिकाला ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
मिकाच्या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन त्याला ट्रोल केलं आहे, एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा नाला वाटत आहे' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, पाणी किती स्वच्छ आहे. एक युझर कमेंट करत म्हणाला, तिथे पाणी खूप अस्वच्छ आहे, त्यामुळे मी हा आयलँड खरेदी केला नाही.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मिकानं अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. मिकाच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच गंदी बात, ढोल बजाके, मौजा ही मौजा, वीर दी वेडिंग, विसल बजा 2.0, सावन मैं लग गई आग ही हिट गाणी देखील मिरानं गायली आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
