एक्स्प्लोर
#MeToo : स्वरा भास्करचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला मीटूच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. ती म्हणाली की, "एका दिग्दर्शकाने तिचे लैंगिक शोषण केले होते."
मुंबई : #MeToo हे वादळ आता शमलं असल्याची बोलले जात होते. परंतु आता पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला मीटूच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. ती म्हणाली की, "एका दिग्दर्शकाने तिचे लैंगिक शोषण केले होते. परंतु ती गोष्ट समजण्यासाठी तिला 6-7 वर्ष लागली."
स्वराने असा आरोप करत असताना कोणाचेही नाव घेतलेले नाही. ती म्हणाली की कामाच्या ठिकाणी तिचे लैंगिक शोषण झाले होते. ते करणारा एक दिग्दर्शक होता.
स्वरा म्हणाली की, "मला ही गोष्ट समजण्यासाठी 6-7 वर्ष लागली. मी जेव्हा एका कार्यक्रमात काही लोकांसोबत बोलत होती. तेव्हा तिथे एक महिला कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे एका व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले, याबाबत सांगत होती. तेव्हा मला समजले की, माझ्यासोबत झालेली घटनादेखील लैंगिक शोषणच होते."
स्वरा म्हणाली की, "आपल्या देशात मुलींना त्यांचे लैंगिक शोषण होत आहे. हे कसे ओळखावे याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही. मुलींना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. कदाचित त्यामुळे लैंगिक शोषणापासून मुली स्वतःला वाचवू शकतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement