Alia Bhatt Get Mistaken For Aishwarya Rai: मेट गाला इव्हेंटमध्ये फोटोग्राफर्सचं झालं कन्फ्यूजन; आलियाला म्हणाले 'ऐश्वर्या'; व्हिडीओ होतोय व्हायरल
आलिया (Alia Bhatt) ही सध्या मेट गाला या इव्हेंटमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.
Met Gala 2023: मेट गाला 2023 (Met Gala 2023) हा इव्हेंट काही दिवसांपूर्वी पार पडला. या इव्हेंटमध्ये हॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या बॉलिवूड अभिनेत्रींनी मेट गाला या इव्हेंटसाठी खास लूक केला होता. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आलिया भट्टनं प्रथमच मेट गाला या इव्हेंटला हजेरी लावली होती. मेट गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील आलियाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला. पण आलिया ही सध्या या मेट गाला इव्हेंटमधील लूकमुळे नाही तर या इव्हेंटमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.
आलिया जेव्हा मेट गाला या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर आली, तेव्हा अनेक फोटोग्राफर्स तिला 'ऐश्वर्या' अशी हाक मारत होते. आलियाचा मेट गाला इव्हेंटमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया फोटोसाठी पोज देताना दिसत आहे तर फोटोग्राफर्स हे तिला 'ऐश्वर्या' अशी हाक मारत आहे, असं ऐकू येत आहे. आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये फोटोग्राफर्सचं कन्फ्यूजन झाला असावं, असा अंदाज नेटकरी लावत आहेत. या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकरी कमेंट्स करत आहेत.
idc what ppl say but alia bhatt literally slayed at the met gala #MetGala pic.twitter.com/4s8C0qPTqk
— MET GALA ERA (@softiealiaa) May 2, 2023
मेट गाला या इव्हेंटमध्ये आलिया भट्टने परिधान केलेल्या गाउनवर 1 लाख मोती होते. आलियाच्या मेट गाला या इव्हेंटमधील लूकचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं.
आलियाचा आगामी चित्रपट
View this post on Instagram
आलियाचा आगामी चित्रपट
आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात आलियासोबतच रणवीर सिंह देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. आलियाच्या डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया , गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच आलिया ही लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिची हार्ट ऑफ स्टोन ही वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या