नाशिकला परत निघाले, कारवरील ताबा सुटून दुभाजकावर धडकले, जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू, सारं गाव हळहळलं
Nashik Accident: वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला.

Nashik accident: त्र्यंबकेश्वर वरून नाशिककडे येत असताना झालेल्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय .मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली . यात पंकज काळू दातीर (30), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (28) अशी मृतांची नावे आहेत . अपघात एवढा भयंकर होता की यात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय .गाडीत दुसरे कोणी नसल्याने दोन्ही तरुणांना वेळेत मदत मिळाली नाही .त्यामुळे त्यांनी जागीच जीव सोडला .
नेमकं घडलं काय ?
पंकज काळू दातीर आणि अभिषेक न्यानेश्वर घुले हे दोघं मंगळवारी रात्री त्र्यंबकेश्वरहून कारने नाशिककडे येत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास ते बेझे फाट्याजवळ पोहोचले असताना त्यांच्या होंडा सिटी कारवरील नियंत्रण अचानक सुटलं. वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि दोघेही गाडीत अडकल्यामुळे त्यांना कुणीही वाचवू शकलं नाही. काही वेळाने पोलीस आणि स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेलं, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघात घडला, तेव्हा गाडीत इतर कोणीही नव्हतं. हा अपघात गाडीवरील ताबा सुटल्यामुळे झाला असून वेग, अंदाज चुकणं किंवा रस्त्याची परिस्थिती हे कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भीषण अपघातात जिवलग मित्रांचा मृत्यू
त्र्यंबकेश्वर वरून नाशिकला परतताना एका भीषण अपघातात दोन तरुणांच्या जागेत मृत्यू झाला .पंकज आणि अभिषेक हे दोघेही नाशिककडे परतत होते .22 जुलै मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बेझ फाट्याजवळ तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले . त्यामुळे कार वेगात जाऊन दुभाजकावर आदळली . यात दोन्ही जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला . दोघांच्या अपघातामुळे दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय . पंकज दातीर एका खाजगी संस्थेत कार्यरत होते .त्याच्या मागे आई-वडील पत्नी व साडेतीन वर्षांचा मुलगा आहे .तर अभिषेक घुले याचं कुटुंब ही या घटनेमुळे पूर्णतः हादरले आहे .
हेही वाचा
























