Merry Christmas : कतरिना कैफ अन् विकी कौशलच्या 'मेरी क्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या 'मेरी क्रिसमस' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
![Merry Christmas : कतरिना कैफ अन् विकी कौशलच्या 'मेरी क्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित Merry Christmas Vijay Sethupathi Katrina Kaif Merry Christmas release on 12 January 2024 Clash With Deepika padukone Bollywood Entertainment Latest Update Merry Christmas : कतरिना कैफ अन् विकी कौशलच्या 'मेरी क्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/16/88336d992a4832ee3fb3ae012c0796f71700131228065254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Merry Christmas New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) काही दिवसांपासू त्यांच्या आगामी 'मेरी क्रिसमस' (Merry Christmas) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
'मेरी क्रिसमस' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'मेरी क्रिसमस' हा सिनेमा आधी 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 8 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. पण आता पुन्हा या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'मेरी क्रिसमस'
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा 'मेरी क्रिसमस' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. वारंवार या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कतरिना आणि विजय यांचा 'मेरी क्रिसम हा सिनेमा 8 डिसेंबरला नव्हे तर 2024 च्या जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
'फायटर' अन् 'मेरी क्रिसमस' आमने-सामने
विजय सेतुपती आणि कतरिना कैफच्या 'मेरी क्रिसमस' या सिनेमाची टक्कर आता दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या 'फायटर' या सिनेमासोबत होणार आहे. दीपिका आणि हृतिकचा फायटर हा सिनेमा 2024 च्या जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांची टक्कर होणार आहे.
कतरिनाकडे सिनेमांची रांग (Katrina Kaif Movies)
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईमध्ये आहेत. तिचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) अॅक्शन करताना दिसत आहे. इमरान हाशमीदेखील या सिनेमात नकारात्मक भूमिकेत आहे. तसेच शाहरुखची झलकही या सिनेमात पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
Merry Christmas Release Date : 'मेरी क्रिसमस' सिनेमाची रिलीज डेट बदलली; 'या' दिवशी होणार रिलीज!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)