Merry Christmas Song Out: 'मेरी ख्रिसमस' मधील 'नजर तेरी तुफान' गाणं रिलीज; कतरिना आणि विजयच्या लिपलॉक सीननं वेधलं लक्ष
Merry Christmas Song: 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या चित्रपटातील 'नजर तेरी तुफान' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात कतरिना कैफ आणि विजय थलपथी यांच्या रोमँटिक अंदाजानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
![Merry Christmas Song Out: 'मेरी ख्रिसमस' मधील 'नजर तेरी तुफान' गाणं रिलीज; कतरिना आणि विजयच्या लिपलॉक सीननं वेधलं लक्ष Merry Christmas Song Out katrina kaif on screen romance with vijay thalapathy in nazar teri toofan song Merry Christmas Song Out: 'मेरी ख्रिसमस' मधील 'नजर तेरी तुफान' गाणं रिलीज; कतरिना आणि विजयच्या लिपलॉक सीननं वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/6890c5e6f894b3c67eceee4a2e05a6bf1704381355189259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Merry Christmas Song Out: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटातील 'नजर तेरी तुफान' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात कतरिना कैफ आणि विजय थलपथी यांच्या रोमँटिक अंदाजानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
कतरिना आणि विजय यांच्या 'लिपलॉक' सीननं वेधलं लक्ष
'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील 'नजर तेरी तुफान' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. 'मेरी ख्रिसमस'या चित्रपटाचं टायटल ट्रॅक काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता 'नजर तेरी तुफान' या गाण्याला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या गाण्याला प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे. तर पॅपोननं हे गाणं गायलं आहे. गाण्यामधील कतरिना आणि विजय यांच्या 'लिपलॉक' सीननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. तसेच कतरिना आणि विजयचा रोमँटिक अंदाज या गाण्यात दिसत आहे.'नजर तेरी तूफान' या गाण्याचा गीतकार वरुण ग्रोवर आहे.
View this post on Instagram
कधी रिलीज होणार 'मेरी ख्रिसमस'?
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट 12 जानेवारीला रिलीज होणार आहे. मेरी ख्रिसमस या चित्रपटात कतरिना आणि विजय यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिनू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर या चित्रपटात कॅमिओ भूमिका करताना दिसणार आहेत. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची कथा ख्रिसमसच्या संध्याकाळी दोन अनोळखी व्यक्तींच्या भेटीवर आधारित आहे. 'मेरी ख्रिसमस'या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांनी केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)