Merry Christmas OTT Release : कतरिना कैफ अन् विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे पाहता येईल
Merry Christmas : 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धमाका करत आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Merry Christmas OTT Release : 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासून चर्चेत आहे. आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'मेरी ख्रिसमस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धउरा श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांनी सांभाळली आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. ट्रेलरप्रमाणे सिनेमालाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
'मेरी ख्रिसमस' या सिनेमाचं परिक्षकांकडून कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'मेरी ख्रिसमस' कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार?
मीडिया रिपोर्टनुसार, 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 60 कोटी रुपयांत या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत.
View this post on Instagram
'मेरी ख्रिसमस'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या...
'मेरी ख्रिसमस' या सिनेमाची निर्मिती 60 कोटी रुपयांत करण्यात आली आहे. या सिनेमात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. कतरिना-विकीसह संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टीनू आनंद या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला या सिनेमाने 2.55 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने 8 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'मेरी ख्रिसमस' ऑनलाईन लीक
'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीज होताच अनेक ऑनलाईन साइट्सवर लीक झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर कतरिना कैफ आणि विजय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण हा सिनेमा रिलीज झाल्याच्या काही तासांत ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.