एक्स्प्लोर

Jhimma Teaser Release : ’झिम्मा' घडवणार जिवाची सफर

टिझर पाहून तरी 'झिम्मा' हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.

मुंबई : काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिसत होता. पोस्टरवरून काहीतरी भन्नाट असणाऱ्या या चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने यावरील पडदा उठला असून 'झिम्मा'चा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे.

बायकांच्या मनात काय सुरु आहे, त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, तीच आपल्याला 'झिम्मा'मध्ये पाहायला मिळणार आहे. 'झिम्मा'च्या टीझरवरूनच कळतंय चित्रपट किती धमाकेदार असणार आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक दिसत आहे. इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी 'झिम्मा' हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.

या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, "हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्रीला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून फक्त स्वतःसाठी स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणाऱ्या या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे 'झिम्मा'चा टिझर सर्वांसमोर आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही."

'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' हा सिनेमा येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget