एक्स्प्लोर
अभिनेत्री करिष्मा कपूरच्या घरी चोरी करणारा अटकेत
अभिनेत्री करिष्मा कपूरच्या घरी कारपेंट्रीच्या बहाण्याने शिरुन घरकाम करणाऱ्या महिलेची पर्स चोरणाऱ्या इसमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
![अभिनेत्री करिष्मा कपूरच्या घरी चोरी करणारा अटकेत Man Steals Purse From Actress Karishma Kapoors Flat Steals Rs 45 Thousand Latest Update अभिनेत्री करिष्मा कपूरच्या घरी चोरी करणारा अटकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/25125729/Karishma-Kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूरच्या घरी चोरी करणाऱ्या कारपेंटरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करिष्माच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोराने डेबिट कार्ड पळवून 45 हजार रुपये काढले. कारपेंट्री करण्याच्या बहाण्याने इम्तियाझ अन्सारी नावाच्या व्यक्तीने करिष्माच्या खारमधील निवासस्थानी प्रवेश मिळवला.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अन्सारीने कारपेंट्री करण्याच्या बहाण्याने करिष्माच्या घरी प्रवेश केला. करिष्मा घरी नसल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलेने त्याला घरात घेतलं. त्यावेळी तिचं लक्ष चुकवून त्याने पर्स पळवली.
सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने अन्सारीची ओळख पटवल्यानंतर कुर्लातून त्याला बेड्या ठोकल्या. त्याला 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अन्सारीने यापूर्वीही अनेकांच्या घरी सुतारकाम करण्याच्या निमित्ताने प्रवेश मिळवून डल्ला मारल्याची
माहिती पोलिसांनी दिली आहे. कमी किमतीत काम करण्याचं आश्वासन देत तो घरात शिरतो. मौल्यवान
वस्तू लंपास केल्यानंतर काही वस्तू आणण्याच्या बहाण्याने तो घरातून काढता पाय घ्यायचा.
एकट्या महिलांना हेरुन तो चोरी करायचा. आतापर्यंत खार, वांद्रे, आंबोली, जुहू, बोरिवली, सांताक्रुझ, वर्सोवा, विले पारले परिसरात त्याने डल्ला मारला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)