Mamta Mohandas: कॅन्सरवर केली मात, आता गंभीर आजाराचा करतेय सामान; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी माझा रंग गमावत आहे'
ममतानं (Mamta Mohandas) कॅन्सरवर मात केली. पण आता ती विटिलिगो autoimmune disease vitiligo या आजाराचा सामना करत आहे.

Mamta Mohandas: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ममता मोहनदास (Mamta Mohandas) ही सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी ममताला कॅन्सरची लागण झाली होती. ममतानं कॅन्सरवर मात केली. पण आता ती विटिलिगो autoimmune disease vitiligo या आजाराचा सामना करत आहे. नुकतीच ममतानं एक पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. या पोस्टला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
ममताची पोस्ट
ममतानं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'प्रिय सूर्य, मला तुला मिठी मारायची आहे. बरेच स्पॉट्स आहेत, मी माझा रंग गमावत आहे. मी सकाळी तुझ्या आधी उठते. धुक्यातून तुझा पहिला प्रकाशकिरण निघताना बघते. तुझ्याकडे जे काही आहे ते दे. मी तुझी ऋणी आहे.'
ममताच्या या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'काळजी करु नको. हा एक आजार नाही, फक्त स्किन कंडिशन आहे. तू सर्वांसाठी प्रेरणा आहेस. तू लवकरच बरी होशील. देव तुला आशीर्वाद देईल. दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'तू एक फायटर आहे आणि सुंदर आहेस'
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी ममता मोहनदास ही कर्करोगाचा सामना करत होती.तिनं अमेरिकेत उपचार घेण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये एका मुलाखतीत ममतानं कॅन्सरबाबत सांगितलं. ममता म्हणाली, 'मी असे म्हणू शकत नाही की, मी या आजारापूर्वी जितकी मजबूत होते तेवढीच आता स्ट्रँग आहे. मी अशी व्यक्ती होते जिला कशाचीही चिंता नव्हती. मी घाबरले होते. सकारात्मक राहा, हे सांगणे सोपे आहे. '
ममताने 2005 मध्ये हरिहरन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट मयूखममधून पदार्पण केले. लंका (2006) आणि मधुचंद्रलेखा या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तिने काही तेलुगू, कन्नड आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
