Malaika Arora : घटस्फोटानंतर मलायका अरोराला वाटली होती 'या' गोष्टीची भीती
घटस्फोटानंतर सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयानंतर संपूर्ण जग आपल्यावर तुटून पडत आहे की काय? असे वाटत असल्याचे मलायका अरोरा (Malaika Arora) सांगते
![Malaika Arora : घटस्फोटानंतर मलायका अरोराला वाटली होती 'या' गोष्टीची भीती malaika arora on divorce with arbaaz khan says no one wants to live alone and single Malaika Arora : घटस्फोटानंतर मलायका अरोराला वाटली होती 'या' गोष्टीची भीती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/c480e9b75f5c5ae2254e7fa1344fe55b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सिझलिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाच्या लूकची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही होत असते.मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.परंतु, त्याआधी ती अरबाज खानची पत्नी होती. अरबाज आणि मलायका यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. आता मलायकाने अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर एका गोष्टीची भीती वाटत होती, असे सांगितले आहे.
मलायका अरोराने अलीकडेच पिंकविलाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितले की, घटस्फोटानंतर सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयानंतर संपूर्ण जग आपल्यावर तुटून पडत आहे की काय? असे वाटत असल्याचे मलायका सांगते. सर्वात मोठे कारण म्हणजे तिला एकल वर्किंग वुमन व्हायचे होते आणि तीच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, अशी माहिती मलायकाने दिली आहे.
"कोणासाठीही एकटे किंवा सिंगल असणे सोपे नसते. माझ्यासाठीही नव्हते. जेव्हा मी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला सर्वात जास्त भीती वाटली. अशक्तपणाही जाणवला. मग मी ठरवले की मी एकाच वेळी मोठी उडी घेऊ शकत नाही, कारण ते शक्य नाही. पुढे काय होते ते मला दररोज पहावे लागेल. त्यावेळी मनात होते की, जर मी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तर मी त्याचीही काळजी घेऊ शकणार नाही, अशा भावना मलायकाने व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Malaika Arora : आई झाल्यामुळे करिअरवर कसा परिणाम झाला? मलायका अरोरा म्हणाली...
- लॉकडाउनच्या काळात अर्जुन कपूर सोबत रहायची मलायका अरोरा, एका मुलाखतीत केला खुलासा
- काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या 'या' ब्युटी टिप्स!
- PHOTO : मलायका अरोरा आणि कटरिना कैफचा सेम टू सेम लूक व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)