लॉकडाउनच्या काळात अर्जुन कपूर सोबत रहायची मलायका अरोरा, एका मुलाखतीत केला खुलासा
मलायका अरोराने एका मुलाखती दरम्यान ही गोष्ट शेअर केली. क्वॉरंटाईनच्या काळात एका मजेदार अभिनेत्यासोबत राहत असल्याचं तिनं सांगितलं.

मुंबई: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर रिलेशनमध्ये असल्याचं जगजाहीर आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी यावर बोलायचं टाळलं होतं पण 2019 साली त्यांनी आपल्या नात्याबद्दल सर्वांना सांगितलं. आता एका मुलाखतीच्या दरम्यान मलायका अरोराने या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. मलायकानं सांगितलं की ती आणि अर्जुन कपूर एकत्रित क्वॉरंटाईन होते आणि एकमेकांसोबत व्यतित केलेला वेळ हा तिच्यासाठी खास होता.
एका मुलाखतीच्या दरम्यान कोणत्या अभिनेत्यासोबत क्वॉरंटाईन राहण्याची इच्छा आहे असा प्रश्न मलायकाला विचारण्यात आला होता. त्यावर मलायकाने हा खुलासा केला. या क्वॉरंटाईनच्या काळात एका मजेदार अभिनेत्यासोबत आपला वेळ घालवल्याचं मलायकानं सांगितलं. या संपूर्ण काळात ते दोघं एकत्रच राहिले. आता तो अभिनेता अर्जुन कपूर होता हे जगजाहीर आहे.
सप्टेंबर महिन्यात अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर ते दोघंही क्वॉरंटाईन झाले होते. नंतरच्या काळात त्या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते.
लॉकडाउन उठल्यानंतर हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्रच दिसत होते. लॉकडाउनच्या आधी या दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या उठत होत्या. परंतु अद्याप त्यांनी लग्न केलं नाही. असं असलं तरी हे दोघेही आपल्या नात्याबद्दल आनंदी आहेत. नुकतंच हिमाचलमधील धर्मशाळा या ठिकाणचा या दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. या ठिकाणी मलायका ही करीना कपूरच्या कुटुंबासोबत व्हेकेशनला गेली होती. सैफ अली खान आणि अर्जुन कपूर या ठिकाणी त्यांच्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेले होते. अर्जुन कपूर त्याच्या आगामी 'भूत पोलीस' या चित्रपटात दिसणार आहे.
संबंधित बातम्या:
- काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या 'या' ब्युटी टिप्स!
- PHOTO : मलायका अरोरा आणि कटरिना कैफचा सेम टू सेम लूक व्हायरल
- Dadasaheb Phalke Award 2020: मलायकापासून दीया मिर्झापर्यंत अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















