(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malaika Arora Father Death : मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
Malaika Arora Father Death : मलायकाचे वडील अनिल मेहता यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल (पोस्टमार्टेम रिपोर्ट) समोर आला आहे. यामध्ये अनिल मेहता यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
Malaika Arora Father Death : बुधवारी मलायका अरोराचे (Malaika Arora) सावत्र वडील अनिल मेहता (Anil Mehta Death) यांनी इमारतीमधून उडी मारून आत्महत्या (Malaika Arora Father Death) केली. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. मलायकाचे वडील अनिल मेहता यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल (पोस्टमार्टेम रिपोर्ट) समोर आला आहे. यामध्ये अनिल मेहता यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
मलायकाच्या वडिलांचा मृत्यू कशामुळे झाला?
अनिल मेहता यांनी कथितपणे वांद्रे येथील आयेशा मनोर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीमधून उडी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी (11 सप्टेंबर रोजी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अनिल मेहता यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले. या पोस्टमार्टेममध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल मेहता यांनी इमारतीच्या बाल्कनीतून थेट उडी मारल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाडे मोडले. त्याशिवाय, त्यांच्या शरीरावर एकहून अधिक जखमा झाल्याचे आढळले आहे.
पोलिसांनी मलायका आणि आईचा नोंदवला जबाब
दरम्यान, अनिल मेहता यांच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे. अनिल मेहता यांनी दोन्ही मुलींना फोन केल्यानंतर फोन बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले. मलायका आणि अमृताने म्हटले होते की त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला होता आणि "मी आजारी आणि थकलो आहे" असे सांगितले होते.
या फोननंतर घरातील लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, अनिल यांनी फोन बंद करून ठेवला होता. पोलीस आता त्याच्या डॉक्टरांचे जबाब नोंदवणार असून, यासोबतच संबंधित कुटुंबातील इतर सदस्यांचेही जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनिल मेहता यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तर, कुटुंबीय आणि नातेवाईकांकडेही पोलिसांनी चौकशी सुरू केली. मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.