एक्स्प्लोर
Malaal Trailer | भन्साळींची भाची आणि जावेद जाफरीच्या मुलाचं लाँचिंग
मीझान आणि शर्मिन सेहगल यांचं बॉलिवूड पदार्पण असलेल्या 'मलाल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
मुंबई : दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमातून प्रसिद्ध विनोदी अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मीझान आणि भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. मराठी मुलगा आणि उत्तर भारतीय मुलगी यांची 'लव्ह अँड हेट' स्टोरी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
'टिंग्या' या पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा दिग्दर्शक मंगेश हाडवळेकडेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. भूषण कुमार, किशन कुमार, महावीर जैन आणि संजय लीला भन्साळींनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. संगीताची जबाबदारी संजय लीला भन्साळींकडेच आहे.
मुंबईतल्या एका चाळीमध्ये चित्रपटाचं कथानक घडत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. सरधोपट सिनेमांप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करता करता नायक-नायिका एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुन्हा एकमेकांकडे पाठ फिरवतात.
गणपती, होळी उत्सवाच्या सेलिब्रेशनमधून नाच गाणी दाखवत सिनेमाला 'मराठी टच' देण्याचा प्रयत्न दिसत आहे. 'हमारे लोगो को हटा के हर चीझ पे कब्जा कर रहे है', 'माझं डोकं फिरवू नको' यासारखे डायलॉग मीझानच्या तोंडी ऐकायला मिळतात, पण शोभत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 28 जून 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement