Yaar Julahe: 'यार जुलाहे' मध्ये पाकिस्तानी कलाकार करणार गुलजार, मंटो आणि चुगताई यांच्या कथांचे वाचन
Yaar Julahe: गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी यांच्या कथांचे वाचन पाकिस्तानी कलाकार करणार आहेत.
Yaar Julahe: महान लेखक गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी यांच्या कथांवर आधारित ‘यार जुलाहे’ ही सीरिज 3 जूनपासून 'जिंदगी' या वाहिनीच्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. या सीरिजमध्ये पाकिस्तानमधील कलाकार विविध लेखकांच्या कथांचे वाचन करताना दिसणार आहेत.
‘यार जुलाहे’ या सारिजमध्ये माहिरा खान, सरवत गिलानी, निमरा बुचा आणि फैसल कुरेशी हे पाकिस्तानी कलाकार गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी या चारही लेखकांच्या कथा वाचताना दिसतील. यार जुलाहे या सीरिजचे चार भाग जून महिन्याच्या चार वीकेंडला 'जिंदगी' च्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जातील.
माहिरा खान करणार अहमद नदीम कासमी यांच्या कथेचे वाचन
प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका 'हमसफर' आणि 'रईस' या हिंदी चित्रपटाची अभिनेत्री माहिरा खान ही ‘यार जुलाहे’ या सीरिजच्या पहिल्या भागात अहमद नदीम कासमी यांची 'गुडिया' ही कथा वाचणार आहे. दुसऱ्या भागात निमरा बुचा ही पद्मश्री पुरस्कार विजेती इस्मत चुगताई यांची 'मगुल बच्चा' ही कथा वाचणार आहे.
‘यार जुलाहे’ या सारिजच्या तिसऱ्या भागात सरवत गिलानी ही गुलजार यांची 'सनसेट बुलेवर्ड' ही कथा वाचणार आहे. तर ‘यार जुलाहे’ या शोच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या भागात फैसल कुरेशी हा मंटोची 'गुसलखाना' ही कथा वाचताना दिसणार आहे. 'यार जुलाहे' ही सीरिज जिंदगी वाहिनीच्या डीटीएच सेवेवर दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता प्रसारित होणार आहे.
माहिरा खाननं 'रईस' या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात महिरानं प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसोबत काम केलं. हा चित्रपट 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
View this post on Instagram
यार जुलाहे या कार्यक्रमाचे चार भाग जून महिन्याच्या चार वीकेंडला टाटा स्काय, डिश टीव्ही, डी2एच आणि एअरटेल यांसारख्या जिंदगीच्या DTH (डायरेक्ट ब्रॉडकास्ट सॅटेलाइट) प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जातील. 'तेरे बिन', 'हमसफर' या पाकिस्तानी मालिकांना भारतातील प्रेक्षकांची देखील पसंती मिळाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :