Pak Actress Sabeena Farooq On India: "भारतीय प्रेक्षकांसारखं प्रेम पाकिस्तानात मिळत नाही..."; पाकिस्तानी अभिनेत्रीकडून भारतातील प्रेक्षकांचे भरभरुन कौतुक
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 'तेरे बिन' या पाकिस्तानी मालिकेतील अभिनेत्री सबीनानं (Sabeena Farooq) भारतातील प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल सांगितलं.

Pak Actress Sabeena Farooq On India: पाकिस्तानमधील (Pakistan) प्रसिद्ध अभिनेत्री सबीना फारुखचा (Sabeena Farooq) चाहता वर्ग मोठा आहे. सबीनाला पाकिस्तानी (Pakistani Actress) मालिका 'तेरे बिन' (Tere Bin) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं हया ही भूमिका साकारली आहे. 'तेरे बिन' मधील हया या भूमिकेच्या माध्यमातून सबीना घराघरात पोहचली. सबीनाला पाकिस्तानाबरोबरच भारतात देखील लोकप्रियता मिळाली. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सबीनानं भारतातील प्रेक्षकांचा पाकिस्तानी मालिकांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं.
भारतातील प्रेक्षकांबाबत काय म्हणाली सबीना?
पाकिस्तानातील मालिकांची क्रेझ भारतात वाढताना दिसत आहे. मेरे हमसफर, तेरे बिन या पाकिस्तानातील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तेरे बिन मालिकेतील सबीना फारुखनं एका मुलाखतीमध्ये तिच्या हया या भूमिकेला भारतातील प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, भारतातील लोकांच्या रिअॅक्शनबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. लोक मालिकेबाबत खूप चांगली प्रतिक्रिया देतात. भारतातील लोक मालिकेतील डिटेल्स देखील सांगतात. ते तुमच्या कॅरेक्टरचं खरोखर कौतुक करतात. मला ते ऐकून खूप बरे वाटते.'
पुढे सबीनानं सांगितलं,'माझ्या भूमिकेला भारताकडून जसा प्रतिसाद आणि प्रेम मिळते, तसे पाकिस्तानकडून मिळत नाही. जे माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक आहे. नकारात्मक भूमिकेमुळे इथले लोक माझ्याबद्दल खूप वाईट बोलतात.' सबीनच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. सध्या सोशल मीडियावर सबीनाच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.
View this post on Instagram
'तेरे बिन' या मालिकेमध्ये सबीनासोबतच सामी खान, नीलम मुनीर, लैला झुबेरी यांनी देखील काम केलं आहे. सबीना ही पाकिस्तानमधील मनोरंजनक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सबीना ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. सबीना तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सबीनाला इन्स्टाग्रामवर 468K फॉलोवर्स आहेत. मालिकांमधील सबीनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सबीनानं 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या जनान चित्रपटामध्ये काम केलं. सुनो चंदा 2, लोग क्या कहेंगे या मालिकांमध्ये सबीनानं महत्वाची भूमिका साकारली. सबीनानं वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
