एक्स्प्लोर

Mahima Chaudhry : पहिला सिनेमा सुपरहिट...लग्न, दोनदा गर्भपात, घटस्फोट अन् कॅन्सरची लढाई; जाणून घ्या अभिनेत्रीच्या संघर्षाची कहाणी

Mahima Chaudhry : अभिनेत्री महिमा चौधरीने वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे.

Mahima Chaudhry : अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) अनेक सुपरहिट सिनेमाचा भाग आहे. पण गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे ती मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. आता कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' या सिनेमाच्या माध्यमातून ती रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. लग्न, दोनदा गर्भपात, घटस्फोट आणि कॅन्सर अशा सर्व गोष्टींचा सामना केल्यानंतर आता अभिनेत्री रुपेरी पडदा गाजवायला सज्ज आहे. 

महिमाने 1997 मध्ये आलेल्या 'परदेस' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमाने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यावेळी अभिनेत्री टेनिसपटू लिअँडर पेसला डेट करत होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर महिमाचं नाव अजय देवगणसोबत जोडलं गेलं.

करिअर पीकवर असताना महिमाचा भीषण अपघात झाला. 1994 मध्ये ती 'दिल क्या करे' या सिनेमाचं शूटिंग करत होती. या शूटिंगदरम्यान महिमाचा अपघात झाला होता. तिच्या चेहऱ्यालाही मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर महिमा 2006 मध्ये बॉबीसोबत लग्नबंधनात अडकली. महिमाने 2007 मध्ये अरियाना जन्म दिला. त्यानंतर दोनदा गर्भपात करण्यात आला. पुढे बॉबी आणि तिचं
नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2013 मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. महिमाची कर्करोगाशी झुंझ यशस्वी झाली आहे.  

महिमा चौधरीबद्दल जाणून घ्या... (Who Is Mahima Chaudhry)

महिमा चौधरी एक लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे. महिमाचं खरं नाव रितू चौधरी असं आहे. सुभाष घईंच्या 'परदेस' या सिनेमाच्या माध्यमातून महिमाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला. त्यानंतर अनेक अनेक हिंदी सिनेमांत काम केलं. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

महिमाने 'धडकन','दिल है तुम्हारा','लज्जा' आणि 'बागवान' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. पण 2008 नंतर तिने निवडक प्रोजेक्टलाच होकार दिला. 2016 मध्ये आलेल्या 'चॉकलेट' या बंगाली सिनेमात ती मध्यवर्ती भूमिकेत होती. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' या सिनेमाच्या माध्यमातून महिमा चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमातील महिमा चौधरीचा लूकही समोर आला आहे. या सिनेमात अभिनेत्री प्रसिद्ध लेखक पुपुल जयकर यांची भूमिका साकारत आहे. महिमाचा लूक हुबेहूब पुपुल जयकरसारखा आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर महिमा या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पडद्यावर कमबॅक करत आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Mahima Chaudhry : जाहिरात क्षेत्रातून थेट बॉलिवूडपर्यंतची मजल! वाचा अभिनेत्री महिमा चौधरीबद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025Buldhana Farmer Death | पाण्याच्या संघर्षाला कंटाळून शेतकरी कैलास नागरे यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 13 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Embed widget