एक्स्प्लोर
अभिनेत्री महिमा चौधरीचे भाऊ-वहिनी अपघातात मृत्युमुखी

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा मामेभाऊ आणि त्याच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला. मीरत-हापुर महामार्गावर सुर्य प्रताप आणि आंचल यांचा मृत्यू झाला, तर महिमाचे मामा गंभीर जखमी झाले आहेत. मीरत-हापुर हायवेवरुन जाणाऱ्या महिमाच्या भावाच्या कारला बसने धडक दिली. यावेळी कार चालवणाऱ्या सुर्य प्रतापचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आंचलने रात्री रुग्णालयात प्राण सोडले.
सुर्य प्रतापचे पिता अशोक कुमार यांच्यावर दिल्लीच्या गंगा राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशोक कुमार हे मुलगा आणि सुनेसोबत डॉक्टरकडे जात होते, मात्र त्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला. खारकोडा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुर्य प्रतापचे पिता अशोक कुमार यांच्यावर दिल्लीच्या गंगा राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशोक कुमार हे मुलगा आणि सुनेसोबत डॉक्टरकडे जात होते, मात्र त्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला. खारकोडा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















