Mahatma Phule Film : 'महात्मा फुले' यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी सव्वा दोन कोटींचा निधी मंजूर
Mahatma Phule Film : महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावरील सिनेमाला 19 वर्षानंतर सरकारकडून 2 कोटी 20 लाख निधी मंजूर झाला आहे.

Mahatma Phule Film : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने 2003 मध्ये घेतला होता. मात्र एकोणीस वर्षानंतरदेखील सिनेमाची फक्त संहिता काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आली होती. त्याहून धक्कादायक म्हणजे सर्व नियम धाब्यावर बसवत एका जवळच्या खाजगी कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
या सगळ्या प्रक्रियेत मोठा प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थेट या संबंधित अतिशय महत्त्वाची असलेली फाईल गहाळ करण्यात आली आहे. इतर सर्व फाईल उपलब्ध आहेत मात्र एक महत्त्वाची फाईल कशी गहाळ होते असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
महात्मा फुले यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु अनेक कारणांनी चित्रपट निर्मितीला सुरुवातच झाली नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सिनेमा निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला विनंतीदेखील करण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने विलंब लावल्यामुळे हा सिनेमा विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून निविदा मागवण्यात आल्या होत्या.
चित्रपट निर्मिती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे चित्रपट निर्मिती प्रक्रियामध्ये कुठेही खंड पडणार नाही याची दक्षता घेणे, चित्रपटनिर्मिती पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून शासनाला सादर करणे, तसेच चित्रपटाची निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याबाबत खात्री करणे आणि देखरेख ठेवून चित्रपट निर्मिती वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयावर असणार आहे.
संबंधित बातम्या
Vicky-Katrina Wedding Exclusive : संगीत सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात, बरवाडा फोर्ट विद्युत रोषणाईने झगमगला, खास फोटो एबीपी माझाच्या हाती
Gadima Puraskar 2021 : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झाला यावर्षीचा 'गदिमा पुरस्कार'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
