Maharashtra Shahir Tailer: 'कलाकाराला चेहऱ्यावरील दु:ख रंगाच्या आड दडवावं लागतं'; ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Maharashtra Shahir Tailer: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील 'बहरला हा मधुमास' या गाण्यानं तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटी या गाण्यावर रिल्स करत आहेत. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या टीझरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि अभिनेता अंकुश चौधरीच्या (Ankush Chaudhari) अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहीर साबळे यांच्या बालपणाची आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांची भूमिका साकारलेल्या कलाकारांची देखील झलक बघायला मिळते. ट्रेलरच्या शेवटी 'असा असतो शाहीर… जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा' हा डायलॉग ऐकू येतो. ट्रेलरमध्ये अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे निर्मिती सावंत हे कलाकार देखील दिसत आहेत. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा हा ट्रेलर सध्या युट्यूबवर ट्रेंड होत आहे.
अंकुश चौधरीनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, 'अभिमानाने, आदराने आणि प्रेमाने सादर करत आहोत.... बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘महाराष्ट्र शाहीर’ चा महाट्रेलर.!! जना-मनातला आवाज अर्थात शाहीर साबळे यांची भव्य जीवनगाथा 28 एप्रिलपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक चित्रपटगृहात..'
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं प्रसिद्ध दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :