Khalnayak Reunion Moment: माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ एकाच फ्रेममध्ये; नेटकरी म्हणाले, "खलनायक-2..."
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), संजय दत्त (Sanjay Dutt), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सुभाष घाई यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला हजेरी लावली.
Khalnayak Reunion Moment: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) आणि त्यांची पत्नी मुक्ता घई (Mukta Ghai) यांनी नुकताच त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सुभाष घाई आणि मुक्ता घाई यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), संजय दत्त (Sanjay Dutt), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सुभाष घाई यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला हजेरी लावली. या पार्टीत माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे देखील उपस्थित होते. माधुरी आणि श्रीराम नेने यांनी नुकतेच या डिनर पार्टीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्रीराम नेने आणि माधुरी यांनी नुकतेच काही खास फोटो शेअर करुन सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि अनुपम खेर ही खलनायक या चित्रपटाची स्टार कास्ट दिसत आहे. 1993 मध्ये खलनायक हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटामधील चोली के पीछे क्या है, नायक नहीं खाल नायक हूं मैं ही गाणी सुपरहिट ठरली. आता सुभाष घई आणि मुक्ता घई यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो पाहिल्यानंतर 'खलनायक-2 चित्रपट रिलीज होणार आहे का?' असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
श्रीराम नेने आणि माधुरी यांनी शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खलनायक टीम एकत्र',तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मला वाटतं खलनायक 2 येणार आहे.'
View this post on Instagram
माधुरीच्या आगामी चित्रपटांची चाहता उत्सुकतेने वाट बघत असतात. बेटा , खलनायक, हम आप के है कौन,दिल तो पागल है या माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या: