Madhurav : 'मधुरव - बोरू ते ब्लॉग'; सोशल मीडियावर गाजलेला अनोखा प्रयोग आता रंगभूमीवर
Madhurav : 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' हा कार्यक्रम रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
Madhurav : कोरोनाकाळात नाट्यगृह बंद असूनही 'मधुरव'ने (Madhurav) घरबसल्या नाट्यरसिकांचं चांगलचं मनोरंजन केलं. 'मधुरव' या नाट्यकृतीचे अनेक ऑनलाईन प्रयोग झाले आहेत. पण आता ही कलाकृती रंगमंचावर येण्यासाठी सज्ज आहे.
'मधुरव - बोरू ते ब्लॉग' ही नाट्यकृती रंगमंचावर येण्यासाठी सज्ज आहे. येत्या 3 डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरात पार पडणार आहे. मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' होय.
दोन तास हसत-खेळत मनोरंजन आणि प्रबोधन, तसंच साहित्याच्या जवळ नेणारा नवनिर्मित, अभिनव आणि पूर्वी न अनुभवलेला, आणि अनेक उत्तम कलाकार आणि तंत्रंज्ञ यांनी रंगलेला नटलेला असे 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर पार पाडणार आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
मधुरा वेलणकर म्हणाल्या,"मधुरव' हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या काळात फेसबुक व युट्युबवर खूप गाजला. सकारात्मकता आणि करमणूक यांचा उत्तम मेळ घालून लोकांना नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यात आणि व्यक्त होण्याची उमेद देण्यास यशस्वी झालेला हा उपक्रम केल्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून 'कोविडयोद्धा' हा पुरस्कार मिळाला. जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळालेला हा कार्यक्रम आता प्रत्यक्ष घेऊन येत असल्याने रसिकप्रेक्षकांनादेखील नक्कीच आवडेल अशी आशा आहे".
संबंधित बातम्या