(Source: Poll of Polls)
LSD 2 Teaser Out : 'LSD 2' चा टीझर आऊट, कुटुंबासह पाहण्याचा विचारही करू नका, हा दोन मिनिटं 13 सेकंदाचा व्हिडीओ
LSD 2 Teaser Out : अखेर बहुप्रतिक्षीत चित्रपट 'एलएसडी 2'चा टीझर आऊट झाला आहे. चित्रपटाचा टीझर अतिशय बोल्ड आणि खतरनाक आहे. त्यामुळे चित्रपट कसा असेल याची कल्पना येते.
LSD 2 Teaser Out : निर्माती एकता कपूरचा (Ekta Kapoor) बहुचर्चित चित्रपट एलएसडीच्या सिक्वेलवर बाबत मागील काही वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. सिक्वेलची घोषणा झाल्यानंतर चित्रपट चर्चेत होता. चाहत्यांमध्येही उत्सुकता लागली होती. अखेर बहुप्रतिक्षीत चित्रपट 'एलएसडी 2'चा टीझर आऊट झाला आहे. चित्रपटाचा टीझर अतिशय बोल्ड आणि खतरनाक आहे. त्यामुळे चित्रपट कसा असेल याची कल्पना येते. दिबांकर बॅनर्जी दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर कसा असेल याची उत्सुकता लागली आहे.
'एलएसडी 2' चा टीझर आऊट
'एलएसडी 2' च्या या टीझरमध्ये रिएलिटी शो, त्यातील नाट्य, सेक्स, अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत.'एलएसडी 2'च्या टीझरमध्ये डिजीटल काळातील लव्ह स्टोरी आहे. सध्याच्या पिढीतील मुल कशा पद्धतीने कोणताही विचार न करता प्रेमात कोणत्या पातळीपर्यंत उतरतात, त्यावर भाष्य करण्यात आले आहे. या टीझरमध्ये उर्फी जावेदची झलक दिसून येते.
View this post on Instagram
लोकांनी काय म्हटले?
सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टीझरवर तर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. लोकांनी चित्रपटाबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. सध्याच्या पिढीला उद्वस्त करण्यासाठी या लोकांनी कोणतीही कसूर सोडली नाही. त्यामुळेच लोक तणावात जात आहेत. एका युजरने हा टुकार चित्रपट असल्याचे म्हटले. तर, एका युजरने अरे काय बनवलंय यार... एवढंच म्हटले आहे.
'लव्ह सेक्स और धोखा 2' या सिनेमात उर्फी जावेदसह 'बिग बॉस 16' फेम निमृत कौर अहलूवालियादेखील दिसणार आहे. 2010 मध्ये आलेल्या 'LSD' या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे.
टीझर रिलीज आधी दिग्दर्शकाने दिला होता इशारा
View this post on Instagram
टीझर रिलीजच्या एक दिवस आधी, चित्रपटाचे दिग्दर्शक दिबांकर बॅनर्जी यांनी एक डिस्क्लेमर जारी केले होते. यामध्ये त्यांनी लोकांना एक आवाहन केले होते. त्यांनी म्हटले होते की, आम्ही ज्या प्रकारे एलएसडीचा पहिला भाग बनवला, त्याचा सिक्वेलही तसाच आहे. चित्रपटात आपल्या आजूबाजूचे सत्य दाखवले आहे. पण आजकाल सत्य स्वीकारण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्याची फॅशन काहीशी वाढली आहे. तुम्हीही त्या फॅशनमध्ये असाल तर चित्रपटाचा टीझर पाहू नका असे दिबांकर बॅनर्जी यांनी म्हटले होते.