Lok Sabha Election Akshay Kumar : अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? या मतदारसंघातून उभे राहणार?
Lok Sabha Election Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील निवडणूक लढवू शकतो. अक्षय कुमार हा दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, वीरेंद्र सेहवागदेखील निवडणूक लढवू शकतो.
Lok Sabha Election Akshay Kumar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काही दिवसांचा अवधी राहिला आहे. सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांची निवड सुरू असून यंदाही भाजप बॉलिवूडकर आणि माजी क्रिकेटपटूंना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akashy Kumar) देखील निवडणूक लढवू शकतो. अक्षय कुमार हा दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, वीरेंद्र सेहवागदेखील ( Virender Sehwag) निवडणूक लढवू शकतो.
लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत युती करण्यासोबतच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही जागावाटप करण्यात आले आहे. यानंतर भाजपनेही दिल्लीतील जागांचा आढावा घेणे सुरू केले आहे. काही जागांवर नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. खासदारांचा ट्रॅक रेकॉर्ड, एमसीडीमधील पराभव आणि इतर काही घटकांच्या आधारे भाजप यावेळी दिल्लीतील पाच किंवा सातही जागांवर नवीन चेहरे उभे करू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. यावेळी दोन जागांवर महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग यांना संधी?
दिल्लीतील सात जागांपैकी उत्तर-पूर्व, पूर्व, चांदनी चौक, उत्तर-पश्चिम आणि नवी दिल्ली या जागा सर्वाधिक चर्चेत आहेत. ईशान्य दिल्लीचे विद्यमान खासदार आणि दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांना तिसऱ्यांदा या जागेवरून तिकीट मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. चांदणी चौक मतदारसंघाबाबतही संभ्रम आहे. कोविड काळातील निष्क्रियता आणि वय यामुळे विद्यमान खासदाराला संधी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघातून अक्षय कुमारला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्व दिल्लीतून विद्यमान खासदार आणि क्रिकेट स्टार गौतम गंभीरला पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागदेखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात सेहवागने काही वैयक्तिक कारणास्तव भाजपची उमेदवारी नाकारली असल्याची बातमी समोर आली होती. यंदा वीरेंद्र सेहवाग काय भूमिका घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.