Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर
ISRO Space Mission Gaganyaan : भारताच्या या अंतराळ मोहिमेतील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इस्रोने चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या विवाहाची माहिती दिली.
![Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर Leena Actress Got Married To ISRO Space mission Gaganyaan Astronaut Prasanth Balakrishnan Nair Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/28/8bd353ad4cb3a37b8fd03524d2e241331709101645632290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ISRO Space Mission Gaganyaan : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आपल्या महत्त्वकांक्षी गगनयान मोहिमेबाबत (Mission Gaganyaan) मंगळवारी मोठी घोषणा केली. इस्रोने आपल्या चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली. प्रशांत नायर (Prashanth Nair), अंगद प्रताप (Angad Prathap), अजित कृष्णन (Ajit Krishnan) आणि शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) अशी या चार अंतराळवीरांची नावं आहेत. भारताच्या या अंतराळ मोहिमेतील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इस्रोने चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या विवाहाची माहिती दिली. जानेवारी महिन्यात या दोघांचा विवाह झाला होता. विवाहाची माहितीदेखील सार्वजनिक करण्यात आली नव्हती.
इस्रोच्या गगनयान या मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवड झालेले अंतराळवीर प्रशांत बालकृष्णन नायर यांच्यासोबत मल्याळम अभिनेत्री लीनाने लग्नगाठ बांधली आहे. मात्र, ही माहिती अभिनेत्रीने सार्वजनिक केली नाही.
गगनयान मिशनसाठी पंतप्रधानांनी 4 नावांची घोषणा केल्यावर अभिनेत्री लीनाचाही आनंद द्विगुणित झाला आणि तिने प्रशांतसोबत विवाह झाला असल्याचे सांगितले. मंगळवारी, 27 फेब्रुवारी रोजी अभिनेत्री लीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात तिने आनंद व्यक्त करताना अंतराळवीर प्रशांत नायर यांच्यासोबत विवाह केला असल्याचे म्हटले.
#ISRO reveals the identities of the four astronaut designates for #Gaganyaan's first crewed mission! 👨🚀
— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) February 27, 2024
• Group Captain Prashanth BalaKrishnan Nair
• Group Captain Ajit Krishnan
• Group Captain Angad Prathap
• Wing Commander Shubhansku Shukla
🇮🇳🇮🇳🇮🇳pic.twitter.com/08bLavQxBT
गगनयान मोहिमेत प्रशांत नायर
अभिनेत्री लीनाने पती प्रशांत बालकृष्णन नायरसोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.आज 27 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय वायुसेनेचे फायटर पायलट ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांना पहिल्या भारतीय एस्ट्रोनॉट विंगने सन्मानित केले. आपल्या देशासाठी, आपल्या राज्य केरळसाठी आणि माझ्यासाठीही ही अभिमानाची बाब असल्याचे अभिनेत्री लीनाने म्हटले.
View this post on Instagram
अभिनेत्री लीनाने म्हटले की, आम्ही 17 जानेवारी रोजी विवाहबद्ध झालो. मात्र, ही बाब गुपित ठेवली होती. मी याच क्षणाची प्रतीक्षा करत होती असेही लीनाने सांगितले.
इतर संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)