एक्स्प्लोर
''लिपस्टिक अंडर माय बुरखा' रिलीज होण्याचा मार्ग मोकळा!

नवी दिल्ली : 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमाला एका आठवड्याच्या आत प्रमाणपत्र देण्यात यावं, असे आदेश फिल्म सर्टिफिकेशन अपील ट्रिब्यूनल अर्थात FCAT ने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत.
असंस्कारी सिनेमा असल्याचा ठपका ठेवत सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला परवानगी नाकारली होती. त्याविरोधात निर्मात्यांनी FCAT मध्ये धाव घेतली होती.
सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला परवानगी नाकारल्याने एफसीएटीमध्ये धाव घ्यावी लागली. मात्र आता एफसीएटीने प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिल्याने सिनेमा रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच रिलीजची तारीख जाहीर केली जाईल, असं सिनेमाचे निर्माते प्रकाश झा यांनी सांगितलं.
यापूर्वी एफसीएटीने सेन्सॉर बोर्डाला 18 एप्रिल 2017 रोजी या सिनेमाला अ श्रेणी प्रमाणपत्र देण्यात यावं, असे आदेश दिले होते. तरीही प्रमाणपत्र देण्यात आलं नाही. निर्मात्यांनी पुन्हा एकदा एफसीएटीकडे धाव घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डाला समन्स पाठवण्यात आला. तरीही काही परिणाम न झाल्याने एफसीएटीने अखेर सिनेमाला प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.
या सिनेमात महिलांच्या आयुष्यातील घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये बोल्ड दृश्य, अपमानजनक शब्द आणि अश्लिल ऑडिओ असल्याचं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं म्हणणं आहे. तसंच हा सिनेमा एका विशिष्ट समाजाप्रती असंवेदनशील असल्याचं पत्र निहलानी यांनी सिनेमाचे निर्माते प्रकाश झा यांना पाठवलं होतं.
या सिनेमात रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मॅसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोरा हे प्रमुख भुमिकेत आहे. मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक पद्धतीवर हा चित्रपट भाष्य करतो.
मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला लैंगिक समानतेवर भाष्य केल्याबद्दल ऑक्सफेम पुरस्कार देण्यात आला होता.
सिनेमाचा ट्रेलर :
संबंधित बातमी : 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' असंस्कारी, सर्टिफिकेट देणार नाही : सेन्सॉर बोर्ड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
