एक्स्प्लोर

Chintan Upadhyay : कलाकार चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप; दिंडोशी सत्र न्यायाल्याने सुनावली शिक्षा

Chintan Upadhyay : कलाकार चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Chintan Upadhyay : कलाकार चिंतन उपाध्यायसह (Chintan Upadhyay) तिघांना जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साल 2015 च्या दुहेरी हत्याकांडात कलाकार चिंतन उपाध्याय आणि इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायाल्याने ही शिक्षा सुनावली आहे.

कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी हत्या प्रकरणी 2015 च्या दुहेरी हत्याकांडमध्ये कलाकार चिंतन उपाध्यायला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चिंतनसह इतर तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायाल्याने ही शिक्षा सुनावली आहे. चिंतन उपाध्यय हा हेमा उपाध्याय यांचा पती होता. हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी या दोघांचीही 2015 मध्ये हत्या झाली होती. चिंतन उपाध्यय यांनी काही जनांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली होती असं तपासामध्ये उघड झालं होतं. अखेर आज शिक्षेची सुनावणी झाली आहे.

पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येची सुपारी देणारा चिंतन उपाध्याय हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आला. साल 2015 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाचा निकाल लागला असून यात चिंतन उपाध्यायसह प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर आणि विजय राजभरवर हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. सरकारी वकिलांकडून सर्व आरोपींकरता फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली असून यावर आता सुनावणी पार पडली आहे. कलाकार चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार असलेला चिंतन हा 'मांडणी शिल्पकार' (इन्स्टॉलेशन आर्टिस्ट) हेमा उपाध्याय यांचा पती होता. या दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू असतानाच हेमा व त्यांचे वकील हरीष भंबानी यांची 11 डिसेंबर 2015 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या दोघांचे मृतदेह टेपमध्ये गुंडाळून खोक्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी कांदिवलीमधील डाहाणूकरवाडी परिसरातील नाल्यात सापडल्यानंतर दुहेरी हत्याकांडाचा हा प्रकार उघडकीस आला होता. 

चिंतनने आपला कारागिर विद्याधर राजभर व त्याच्या अन्य सहकाऱ्यांना या दोघांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली चिंतनला अटक झाली होती. मुंबई सत्र न्यायालय आणि हायकोर्टानं जामीन नाकारल्यानंतर अखेर साल 2021 मध्ये चिंतनला जामीन मंजूर केला. तर या हत्याकांडातील मुख्य मारेकरी विद्याधर राजभर हा अद्याप फरार आहे. एक कुशल कारागिर असलेला विद्याधर हा नेपाळमार्गे परदेशात पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

संबंधित बातम्या

Chintan Upadhyay : हेमा उपाध्यय आणि वकिलाच्या हत्येतील दोषी चिंतन उपाध्यायला फाशी द्या; सरकारी वकिलांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget