Chintan Upadhyay : हेमा उपाध्यय आणि वकिलाच्या हत्येतील दोषी चिंतन उपाध्यायला फाशी द्या; सरकारी वकिलांची मागणी
Hema Upadhyay Murder Case : शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरीश भंभानी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे पती चिंत उपाध्याय यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
मुंबई : चित्रकार-शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरीश भंभानी यांच्या हत्येप्रकरणी (Hema Upadhyay Murder Case) अखेर चित्रकार चिंतन उपाध्याय (Chintan Upadhyay) याला दिंडोशी येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवलं आहे. 2015 यावर्षी हेमा उपाध्याय आणि वकील हरीश भंबानी या दुहेरी हत्याकांड घडलं होतं. हे दुहेरी हत्याकांड नक्की कशासाठी? आणि कोण आहे दोषी याबाबत तपास सुरू होता. मात्र अखेर जवळपास आठ वर्षांनी हत्याकांडातील अखेर दोषी ठरले आहेत.
11 डिसेंबर 2015 चा तो दिवस, मुंबईतील कांदिवलीत चित्रकार - शिल्पकार हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरिश भंबानी यांची दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणांमध्ये तपास सुरू केला असता दोघांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी कांदिवलीमधील डाहाणूकरवाडी परिसरातील नाल्यात सापडलेले होते. त्यानंतर या याप्रकरणी तिघाजणांसह हेमा उपाध्याय यांचा विभक्त पती चिंतन उपाध्याय यालाही अटक करण्यात आली होती. त्यांना अटक होऊनही हत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याचे चित्र गेले अनेक वर्ष होते. त्यामध्ये अखेर कोर्टाने या प्रकरणी दोषी ठरवलेले आहेत.
गेली सात वर्ष नऊ महिने 25 दिवस या प्रकरणी तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. त्यात आता तपासात पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येची सुपारी देणारा चिंतन उपाध्याय आणि इतर काहींना हत्येच्या आरोपात कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येची सुपारी देणारा चिंतन उपाध्याय हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलाय. साल 2015 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाचा निकाल लागला असून यात चिंतन उपाध्यायसह प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर आणि विजय राजभरवर हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. सरकारी वकिलांकडून सर्व आरोपींकरता फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली असून यावर उद्या, शनिवारी निकाल अपेक्षित आहे.
दिंडोशी सत्र उपाध्याय दुहेरी हत्याकांडाची न्यायालयात या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळेला सरकारी वकिलांकडून सर्व आरोपींकरता फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलाकार चिंतन उपाध्यायनं आपली पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरीष भंबानी यांच्या हत्येची सुपारी दिली होती हे आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न झाल्याचं कोर्टात पोलीस वकिलांनी सांगितला आहे.
मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालय सर्व आरोपींच्या शिक्षेवर शनिवारी निकाल देण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी या क्रुर हत्येसाठी चिंतन उपाध्याय, प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर आणि विजय राजभर यांच्याकरता फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
ही बातमी वाचा: