एक्स्प्लोर
झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
![झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी Lesser Known Facts About Zaheer Khans Fiance Sagarika Ghatge झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/25172214/Sagarika-Ghatge.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच 'चक दे' गर्ल सागरिका घाटगेशी विवाहबद्ध होणार आहे. सोमवारी झहीर खानने सागरिकासोबत साखरपुडा झाल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरुन भरभरुन शुभेच्छा दिल्या. मात्र सागरिका घाटगेची 'चक दे' गर्ल या पलिकडेही ओळख आहे.
कोण आहे सागरिका घाटगे
1. 2007 मध्ये आलेल्या 'चक दे इंडिया' या सिनेमातून सागरिका लाईमलाईटमध्ये आली. या सिनेमात सागरिकाने साकारलेली प्रीती सबरवाल ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.
पहिल्याच सिनेमात शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी सागरिकाला मिळाली. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्टार स्क्रीन अॅवॉर्डही मिळाला.
2. चक दे नंतर सागरिकाने फॉक्स, मिले ना मिले हम, रश, जी भर के जीले, इरादा अश्या बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.
3. दिलदरिया हा सागरिकाचा पहिला पंजाबी सिनेमा. या सिनेमासाठी सागरिकाने पंजाबी भाषेचेही धडे गिरवले
4. हिंदी आणि पंजाबी भाषिक सिनेमांसोबतच सागरिकाने मराठीमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. 2013 मध्ये सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट'मध्ये सागरिका झळकली होती.
5. अभिनयासोबतच सागरिका नॅशनल लेव्हलची ख्यातनाम अॅथलिटही आहे.
6. सागरिका खतरोंके खिलाडीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती. यात तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
संबंधित बातम्या :
झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)