(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar : 'लतादीदींना चांगली गाणी, माझ्यासाठी अवघड गाणी', आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्याकडे केली होती तक्रार
Lata Mangeshkar : आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्याकडे तक्रार केली होती की, ''तुम्ही सर्व चांगली गाणी लतादीदींना चांगली गाणी देता आणि मला सर्व अवघड गाणी देता.''
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि आशा भोसले (Asha Bhosale) यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. आशा भोसले यांनी राहुल देव बर्मन म्हणजेच आर. डी. बर्मन यांच्यासोबत अनेक उत्तम आणि अवघड गाणी गायली आहेत. 1966 साली प्रदर्शित झालेल्या 'तीसरी मंझिल' चित्रपटातील 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' हे गाणे खूप अवघड होते. आर. डी. बर्मन यांनी आशा भोसले यांच्याकडून गाणं गाऊन घेतले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' या गाण्यासाठी आशा भोसले यांना जवळपास 10 दिवस सराव करावा लागला. जेव्हा आर. डी. बर्मन यांनी हे गाणे त्यांना दिले तेव्हा त्यांना वाटले की हे इतके अवघड गाणे नाही. पण आशा भोसले यांनी हे गाणे खूप रियाझ करून गायले. गाणे ऐकून आर. डी. बर्मनही खूप खुश झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंदी होऊन आर. डी. बर्मन यांनी आशा भोसले यांना 100 रुपये बक्षीस म्हणून दिले.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यानंतर आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्याकडे तक्रार केली आणि म्हणाल्या, ''तुम्ही सर्व चांगली गाणी दीदींना देता आणि ती सर्व कठीण गाणी मला देता, जी कोणीही गाऊ शकत नाही.'' आशाचे म्हणणे ऐकून आर. डी. बर्मन म्हणाले, ''तु सर्व प्रकारची गाणी गातेस, म्हणूनच मी अशी गाणी बनवतो. तू गाणार नाहीस तर मी अशी अवघड गाणी रचणार नाही.'' आशा भोसले एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1980 मध्ये लग्न केले.
संबंधित बातम्या :
- Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!
- Lata Mangeshkar Songs : 'अजीब दास्तां है ये' ते 'एक प्यार का नगमा', लता मंगेशकरांची 10 सदाबहार गाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha