(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा 'लडकी : ड्रॅगन गर्ल' चीनमध्ये होणार प्रदर्शित; 15 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Ladki The Dragon Girl : 'लडकी : ड्रॅगन गर्ल' हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
Ladki The Dragon Girl : सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. 'लडकी : ड्रॅगन गर्ल' (Ladki The Dragon Girl) हा त्यांचा आगामी सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा मार्शल आर्ट्सवर आधारित आहे. हा सिनेमा देशभरात हिंदीसह पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच चीनमध्येदेखील हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.
'लडकी : ड्रॅगन गर्ल' या सिनेमात पूजा भालेकर (Pooja Bhalekar) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमासाठी पूजाने विशेष मेहनत घेतली आहे. हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरेल. भारतासह हा सिनेमा चीनमध्येदेखील रिलीज होणार आहे. चीनमध्ये हा सिनेमा 40 हजार सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
'लडकी : ड्रॅगन गर्ल' हा सिनेमा हिंदीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या पूजा भालेकरला मार्शन आर्ट्स चांगल्याप्रकारे येतं. त्यामुळेच या सिनेमासाठी तिची निवड करण्यात आली आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने रामगोपाल वर्मांचे चाहते आनंदी झाले आहेत.
संबंधित बातम्या