Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण 7'चा असाही विक्रम; पहिल्याच भागाला मिळाले सर्वाधिक व्ह्यूज
Koffee With Karan : करण जोहरचा 'कॉफी विथ करण 7'चा पहिलाच भाग सर्वाधिक पाहिला गेलेला भाग ठरला आहे.
Koffee With Karan 7 : सिने-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सहा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सातव्या सीझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या भागाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे.
'कॉफी विथ करण 7' च्या पहिल्याच भागाने रेकॉर्ड केला आहे. 'कॉफी विथ करण 7'चा पहिला भाग सर्वाधिक पाहिला गेलेला भाग ठरला आहे. यासंदर्भात माहिती देत करण जोहरने लिहिले आहे, 'कॉफी विथ करण 7'चा पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर हातातलं काम सोडून पहिला भाग नक्की पाहा. 'कॉफी विथ करण 7'चा पहिला भाग तुम्ही दर गुरुवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता."
View this post on Instagram
'कॉफी विथ करण 7'च्या पहिल्या भागात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमातील कलाकारांनी म्हणजेच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहने (Ranveer Singh) हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आलिया आणि रणवीरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. कार्यक्रमात आलिया रणवीरने अनेक गोष्टींचा उलगडा केला.
रणवीरची मिमिक्री प्रेक्षकांच्या पसंतीस
'कॉफी विथ करण 7'च्या पहिल्या भागात रणवीरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. रणवीरने बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, धर्मेंद्र, वरुण धवन, कार्तिक आर्यन, अजय देवगन आणि आमिर खानची मिमिक्री 'कॉफी विथ करण 7'च्या मंचावर केली. रणवीरची मिमिक्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
संबंधित बातम्या
Koffee With Karan 7 : '...लग्नानंतर पहिल्या रात्री'; कॉफी विथ करणमधील आलियाच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात दिसणार सारा अली खान आणि जान्हवी कपूर; 7 जुलैपासून कार्यक्रमाला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)