KL Rahul-Athiya Shetty Marriage : आलिया-रणबीरनंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात
KL Rahul-Athiya Shetty Marriage : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल लवकरच सात फेरे घेणार आहेत.
KL Rahul-Athiya Shetty Marriage : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. दरम्यान बॉलिवूडची आणखी एक जोडी सात फेरे घेणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
दाक्षिणात्य परंपरेनुसार होणार लग्न
रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याची तयारीदेखील सुरू झाली आहे. दाक्षिणात्य परंपरेनुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टीच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली असून वर्षाच्या अखेरीस दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
View this post on Instagram
अथिया शेट्टी ही सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथिया आणि केएल दोघेही दाक्षिणात्य असल्याने त्यांचे लग्नदेखील दाक्षिणात्य परंपरेनुसार होणार आहे. अथिया आणि केएलच्या लग्नाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सुनील शेट्टींनी अद्याप लग्नासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
संबंधित बातम्या