KKBKKJ Box Office: बॉक्स ऑफिसवर सलमानचा जलवा कायम; 'किसी का भाई किसी की जान' नं चौथ्या दिवशी केली एवढी कमाई
'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील गाणी, अॅक्शन सिन्स, सलमानचा हटके अंदाज या सर्वांनाच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
KBKKJ Box Office Collection Day 4: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या फॅमिली एंटरटेनर चित्रपटानं सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील गाणी, अॅक्शन सिन्स, सलमानचा हटके अंदाज या सर्वांनाच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला जास्त कमाई केली नाही. पण वीकेंडला मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी केली. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं चौथ्या दिवसाचं कलेक्शन...
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सलमान आणि पूजा यांच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी तर तिसऱ्या दिवशी 26.61 कोटींची कमाई केली. 'किसी का भाई किसी की जान'न चौथ्या दिवशी 10.50 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 78.67 कोटी एवढी झाली आहे.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
'किसी का भाई किसी की जान' मधील गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा' आणि 'जी रहे थे हम' या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत.
View this post on Instagram
सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: