KKBKKJ Box Office Collection Day 10: 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला 'किसी का भाई किसी की जान'; सलमानच्या चित्रपटानं दहा दिवसात केली एवढी कमाई
दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी (30 एप्रिल) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
KKBKKJ Box Office Collection Day 10: 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस झाले आहेत. हा सलमान खान (Salman Khan) स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करु शकला नाही. त्यानंतर या चित्रपटानं वीकेंडला चांगली कमाई केली. दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी (30 एप्रिल) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या 10व्या दिवशी म्हणजे रविवारी किती कमाई केली आहे? ते जाणून घेऊयात...
10 व्या दिवशी केली एवढी कमाई
एका रिपोर्टनुसार, 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर 10 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 4.50 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून भारतात या चित्रपटानं 100.30 कोटी एवढी कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाचं वर्ल्ड वाइड कलेक्शन जवळपास 150 कोटी झाले आहे.
चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमानसोबतच अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट चित्रपटगृहानंतर ओटीटीवर देखील रिलीज करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पहिल्यांदाज प्रेक्षकांना बघायला मिळाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील गाण्यांना पसंती
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामधील 'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा' आणि 'जी रहे थे हम' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :