Kishore Kumar Birth Anniversary: एक, दोन नाही तर किशोर कुमार यांची झाली होती 4 लग्न, मधुबाला ते गीता बाली 'या' अभिनेत्रींसोबत बांधली होती लग्नगाठ
Kishore Kumar Birth Anniversary: दिवंगत अभिनेते किशोर कुमार यांचा 95 वा वाढदिवस आहे. दरम्यान किशोर कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत.
Kishore Kumar Birth Anniversary: बॉलीवूडचे सर्वोत्कृष्ट गायक आणि अभिनेते किशोर कुमार (Kishor Kumar) यांचा 95 वा वाढदिवस आहे. बॉलीवूडच्या एका सुवर्णकाळावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये किशोर कुमार यांचं नाव अगदी अग्रस्थानी घेतलं जातं. त्यांची गाणी, त्यांचा अभिनय हा अगदी आज्जी आजोबांच्या काळापासून ते आताच्या तरुण पिढीला देखील तितकाच पंसंतीस उतरतो हे विशेष. पण किशोर कुमार हे जसे त्यांच्या कामामुळे चर्चेत राहिले त्याचप्रमाणे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिले आहेत.
किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला.किशोर कुमार यांची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जाते. आपल्या अभिनय आणि गायनासोबतच किशोर कुमार यांचं वैयक्तिक आयुष्यही बरंच चर्चेत राहिलं आहे. किशोर कुमार यांची एक, दोन नव्हे तर चार लग्न झाली होती.
पहिले लग्न रुमा गुहा ठाकुरतासोबत
किशोर कुमार यांनी 1950 मध्ये रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी पहिले लग्न केले. किशोर कुमार तेव्हा 21 वर्षांचे होते. मात्र, किशोर आणि रुमाचे नाते केवळ आठ वर्षे टिकले. 1958 मध्ये दोघेही वेगळे झाले.
ज्येष्ठ अभिनेत्री मधुबालासोबत दुसरे लग्न
रुमा गुहा ठाकुरता यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांनी 1960 मध्ये लग्न केले. मधुबाला यांचे निधन 1969 साली झाले.
योगिता बालीसोबत तिसरं लग्न
योगिता बाली या अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या पत्नी आहेत. पण त्याआधी त्यांचे किशोर कुमार यांच्यासोबत लग्न झाले होते. या दोघांनी 1976 मध्ये लग्नगाठ बांधली. पण दोनच वर्षात त्यांचं लग्न मोडलं. 1978 मध्ये ते दोघेही विभक्त झाले.
लीना चंदावरकर सोबत तिसरी लग्नगाठ
किशोर कुमार यांचे चोथे लग्न लीनासोबत झाले होते. लीना आणि किशोर कुमार यांनी 1980 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. किशोर कुमार आणि लीना यांचे नाते सात वर्षे टिकले. किशोर कुमार यांनी 1987 साली जगाचा निरोप घेतला.
View this post on Instagram