(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Rao On Aamir Khan-Reena Dutta Divorce : माझ्यामुळे आमिरने रिनासोबत घटस्फोट घेतला नाही; किरण रावने केला गौप्यस्फोट
Kiran Rao On Aamir Khan-Reena Dutta Divorce : एका मुलाखतीत किरण रावने आमिरच्या पहिल्या घटस्फोटाबाबत गौप्यस्फोट केला आहे. माझ्यामुळे आमिर आणि रिनाचा घटस्फोट झाला नसल्याचे किरण रावने स्पष्ट केले.
Kiran Rao On Aamir Khan-Reena Dutta Divorce: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत असतो. आमिर खानने रिना दत्तासोबत (Reena Dutta) पहिला विवाह केला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत. अनेक वर्ष संसार केल्यानंतर आमिर-रिनाचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने किरण रावसोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगादेखील आहे. काही वर्षापूर्वीच आमिर आणि किरणचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत किरण रावने आमिरच्या पहिल्या घटस्फोटाबाबत गौप्यस्फोट केला आहे. माझ्यामुळे आमिर आणि रिनाचा घटस्फोट झाला नसल्याचे किरण रावने स्पष्ट केले.
किरण रावमुळे नाही झाला आमिर-रिनाचा घटस्फोट
आमिर खान आणि रिना दत्ता यांनी लगान प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर 2002 मध्ये घटस्फोट घेतला. किरण राव ही लगानची सहाय्यक दिग्दर्शिका होती. त्यामुळे किरण रावमुळेच आमिरचा पहिला घटस्फोट झाला असे अनेकांना वाटते. नुकत्याच एका मुलाखतीत किरण रावने या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे. आमिर खानसोबत आपण 2004 पासून डेटिंगला सुरुवात केली असल्याचे किरण रावने स्पष्ट केले.
View this post on Instagram
किरण रावने सांगितले की, “बऱ्याच लोकांना असे वाटते की आमिर आणि मी लगानपासून डेट करतोय. पण, हे खोटं आहे. आमिर आणि मी स्वदेसच्या वेळी एकत्र आलो. त्यावेळी तो मंगल पांडेचे शूटिंग करणार होता. आशुतोष गोवारीकरसोबत आम्ही कोकच्या काही जाहिराती शूट केल्या होत्या आणि तिथेच आमिर आणि मी पुन्हा कनेक्ट झालो. मी त्याच्या संपर्कात नव्हतो. खरे तर लगानवर मी त्याच्याशी फारसे बोलले नव्हते. लगानच्या वेळी मी खरंतर दुसऱ्याच व्यक्तीला पाहत होती. 2004 मध्ये जेव्हा आमिर आणि मी बाहेर जायला लागलो तेव्हा सगळ्यांना वाटलं की आम्ही 'लगान'चं शूटिंग करत होतो तेव्हापासूनच आमचं सूत जुळलं आणि त्यामुळे आमिर रिनाचा घटस्फोट झाला.
View this post on Instagram
किरणने पुढे म्हटले की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी विवाह करता आणि दुसरा एखाद्या नात्यात आहे, त्यावेळी तुमच्यावर एक मानसिक ओझं असते, ज्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होतो. मी कपल काउंसलिंगवर जोर देते. आमिर आणि मी कपल काउंसलिंग केली होती असेही तिने सांगितले.
घटस्फोटानंतरही आमिर आणि किरणमध्ये बाँडिंग
आमिर खान आणि किरण राव हे 2005 मध्ये विवाह बंधनात अडकले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगले बाँडिंग असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यापूर्वीच आमिर खानची मुलगी आयरा खानच्या विवाह सोहळ्यात किरण रावदेखील उपस्थित होती. आमिर खान हा किरण रावच्या लापता लेडिज या चित्रपटाचा सहनिर्माता आहे.