Sidharth Malhotra And Kiara Advani: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; बायकोनं शेअर केला लिपलॉक करतानाचा फोटो
Sidharth Malhotra And Kiara Advani: कियाराने सिद्धार्थच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. कियारानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.
Sidharth Malhotra And Kiara Advani: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. आज (16 जानेवारी) कियाराने तिचा पती सिद्धार्थच्या 39 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कियारानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.
सिद्धार्थच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन!
कियारानं शेअर केलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थच्या बर्थ-डेसाठी आणलेला स्पेशल केक दिसत आहे. या केकवर सिद्धार्थचं एक मिनिएचर आहे. तसेच सिद्धार्थचे काही फोटो देखील या फोटोवर आहेत. कियाराच्या बर्थ-डे सेलिब्रेशनसाठी फुग्यांचे डेकॉरेशन केले होते. तसेच कियारानं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ हे एकमेकांना लिपलॉक करताना दिसले. कियारानं सिद्धार्थच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "Happy birthday love,"
सिद्धार्थ आणि कियाराचा खास लूक
सिद्धार्थच्या बर्थ-डे सेलिब्रेशनसाठी कियारा आणि सिद्धार्थनं खास लूक केला होता. कियाराने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने रेम्बो रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे तर कियारानं काळ्या रंगाचा ड्रेस आणि मोकळे केस असा लूक सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केला होता.
View this post on Instagram
चित्रपट निर्मात्या आरती शेट्टीने देखील सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सिद्धार्थच्या पार्टीमध्ये करण जोहरही उपस्थित होता.
'शेरशाह' मध्ये कियारा आणि सिद्धार्थ केलं काम
गेल्या वर्षी कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 2021 मध्ये रिलीज झालेल्या कियारा आणि सिद्धार्थ यांच्या शेरशाह या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियारा यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात सिद्धार्थनं कॅप्टन विक्रम बात्रा यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: