KGF फेम यशच्या वाढदिवशी मोठा अपघात; रॉकी भाईच्या बर्थडे पार्टीची तयारी करताना तीन चाहत्यांचा मृत्यू
KGF Actor Yash : कन्नड सुपस्टार यशचा आज वाढदिवस असून बर्थडे सेलिब्रेशनच्या तयारीदरम्यान वीजेच्या धक्क्याने तीन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.
![KGF फेम यशच्या वाढदिवशी मोठा अपघात; रॉकी भाईच्या बर्थडे पार्टीची तयारी करताना तीन चाहत्यांचा मृत्यू Kgf Actor Yash Three Fans Died 3 Injured Due To Electrocution While His 38th Birthday Celebration 3 electrocuted while putting up banner for Kannada Actor Yash 38th birthday Bollywood Entertainement KGF फेम यशच्या वाढदिवशी मोठा अपघात; रॉकी भाईच्या बर्थडे पार्टीची तयारी करताना तीन चाहत्यांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/16f6a5e697db63308abff791194bf95b1704702327945254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Actor Yash Birthday and Accident : कन्नड सुपरस्टार यश (Yash) 'रॉकी भाई' या नावाने जास्त ओळखला जातो. आज अभिनेता आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करताना वीजेच्या धक्क्याने त्याच्या तीन तरुण चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.
केजीएफ (KGF) फेम यशचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्याला त्याचा यंदाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करायचा आहे. चाहतेदेखील लाडक्या सेलिब्रिटीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी करत होते. पण बर्थडे सेलिब्रेशनच्या तयारीदरम्यान त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला असून काही चाहते गंभीर जखमी झाले आहेत.
रॉकी भाईचं कट-आऊट लावताना तीन चाहत्यांचा मृत्यू
कर्नाटकातील गडग जिल्ह्यात यशच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यशचं कट-आऊट लावताना त्याच्या तीन तरुण चाहत्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांचा मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे.
यशचा सिनेप्रवास जाणून घ्या.. (Yash Movies)
यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा असं आहे. त्याने 2007 मध्ये 'Jambada Hudugi' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 2018 मध्ये रॉकी आणि 2013 मध्ये त्याने 'Googly' हा सिनेमा केला. तर 2014 मध्ये त्याचा 'Mr. and Mrs. Ramachari' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'केजीएफ चॅप्टर 1' (खउइ णपोजूाी 1) या सिनेमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. या सिनेमामुळे त्याला जागतिक पातळीवर ओळख मिळाली. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
यशच्या 'केजीएफ चॅप्टर 2' या सिनेमाने जगभरात चांगलीच कमाई केली. या सिनेमात तो संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आला. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. यशचा 'टॉक्सिक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 एप्रिल 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. गीतू मोहनदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यशसह या सिनेमात साई पल्लवीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Yash Movie Title: केजीएफ फेम यशनं चाहत्यांना दिलं सरप्राइज; आगामी चित्रपटाच्या नावाची केली घोषणा, शेअर केला खास व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)