Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding : मोबाईलला बंदी, कडेकोट बंदोबस्त; तरिही विकी-कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडीओ व्हायरल, पाहुण्यांचं शाही स्वागत
Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding : विक्की कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफ यांच्या (Katrina Kaif) यांच्या लग्नासोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding Latest Updates: विक्की कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफ यांच्या (Katrina Kaif) यांच्या लग्नासोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे. सवाई माधोपूरच्या किल्ल्यामध्ये विकी आणि कतरिनाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. सध्या विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक जोधा अकबर गाण्यातील 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे लोक आलेल्या पाहूण्यांचे स्वागत करत आहेत. पण अनेकांना प्रश्न पडत आहे की, विकी आणि कतकरिनाच्या लग्नामध्ये इतके नियम आणि कडेकोट बंदोबस्त असूनही हा व्हिडीओ व्हायरल कसा झाला? त्यामुळे हा व्हिडीओे खरच विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
View this post on Instagram
कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि Abhijit Bichukale चा 'बिग बॉस'मध्ये दिसणार जलवा