Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला हवाय 'असा' जोडीदार; रिलेशनशीपबाबत केला खुलासा
Kartik Aaryan Ideal Girl : कार्तिक आर्यनला करीना कपूर आणि प्रियंका चोप्रासारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे.

Kartik Aaryan Relationship Status : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा लोकप्रिय बॅचलर आहे. व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा तो चर्चेत असतो. अभिनेत्याच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कार्तिक आर्यन अजून सिंगल आहे. पण अनेक अभिनेत्रींसोबत तिची तुलना होत असते.
कार्तिक आर्यनला नुकताच 'फ्रेडी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्याने त्याला कसा पार्टनर हवा याबद्दल भाष्य केलं आहे. कार्तिक म्हणाला की त्याला करीना कपूर (Kareena Kapoor) आणि प्रियांका चोप्राचं (Priyanka Chopra) कॉम्बिनेशन असलेली मुलगी हवी आहे.
View this post on Instagram
'फ्रेडी' पुरस्कार पटकावल्यानंतर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे. कार्तिकने लिहिलं आहे की,हे पात्र साकारणं खूप चॅलेंजिंग होतं. या भूमिकेसाठी मी 15 किलो वजन वाढवलं आहे". कार्तिक आर्यन लवकरच 'चंदू चॅंप्मियन' या सिनेमात झळकणार आहे हा सिनेमा पुढील वर्षात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासह तो 'आशिकी 3' या सिनेमातही झळकणार आहे.
कार्तिकच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kartik Aaryan Movies)
कार्तिकचा काही दिवसांपूर्वी 'शेहजादा' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण सध्या कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 2' या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कार्तिकच्या लव्ह आज कल, प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी आणि लुका छुप्पी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 'चंदू चॅम्पियन' या सिनेमात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Kartik Aaryan : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
