एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

करिश्मा-संजय यांच्यात घटस्फोटावर सहमती, करिश्माकडे मुलांचा ताबा

नवी दिल्ली : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्यातील घटस्फोट प्रकरणात आज एक तडजोड झाली. परस्पर संमतीने वेगळं होण्यासाठी दोघेही तयार झाले आहेत. या दोघांमध्ये मुलांच्या ताब्याबाबत मोठा वाद होता. मात्र करारानुसार, दोन्ही मुलांचा ताबा करिश्माकडे असेल. तर संजयला मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.   हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात का गेलं? - करिश्मा आणि संजयचं लग्न 14 वर्षांपूर्वी झालं होतं. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि आता घटस्फोटाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. - दोघांनी 2014 मध्ये मुंबईमध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. पण संजय कपूरने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत व्हावी. कारण मुंबईत रवी पुजारी टोळीकडून धमकी मिळत आहे, अशी मागणी केली होती.   गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बातचीत - संजय आणि करिश्माने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये जवळजवळ सर्व मुद्द्यांवर तडजोड झाली. समायरा आणि कियानच्या कस्टडीचा मुद्दा शुक्रवारी सकाळी सोडवला. - मुलं सध्या करिश्मा सोबत राहतात. मुलांना भेटणं आणि ताबा या दोन मुद्द्यावर वाद होता. - चर्चा करुन हा मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिल्ली हायकोर्टाने आधीच दिला होता. - करिश्माने 2012 मध्ये संजयचं घर सोडलं होतं. सध्या ती आई-वडिलांसह मुंबईत राहते. तर संजय कपूर दिल्लीत राहतो. - करिश्मा कपूरने संजय आणि तिच्या सासूविरोधात हुंड्यासाठी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती.   2012 पासून करिश्मा-संजय वेगळे - करिश्माने 29 सप्टेंबर, 2003 रोजी बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. हे करिश्माचं पहिलं आणि संजयचं दुसरी लग्न होतं. - 2012 मध्ये दोन्ही वेगळे झाले. करिश्मा तिची आई बबिता यांच्यासोबत मुंबईत राहते. - परस्पर संमतीने दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. - नोव्हेंबर 2015 मध्ये दोघांनी मुंबईच्या फॅमिली कोर्टातून घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. - घटस्फोटासाठी निश्चित केलेली आर्थिक अट संजय कपूर पूर्ण करु शकला नाही, असं करिश्माने सांगितलं. - संजयने मुंबईच्या वांद्रे कोर्टात डिसेंबरमध्ये पुन्हा घटस्फोटाता अर्ज दाखल केला होता. - त्यानंतर रवी पुजारी टोळीकडून धमकी मिळत असल्याच्या तक्रारीनंतर संजयने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget