एक्स्प्लोर
गर्भ लिंग परीक्षणाच्या आरोपांबाबत सैफ अली खान म्हणतो...
मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि पत्नी करिना कपूर खान यांनी गर्भातील बाळाची लिंग तपासणी केल्याच्या आरोपांबाबत अखेर सैफने मौन सोडलं आहे. मी आणि करिना कोणतीही 'सेक्स डिटरमिनेशन टेस्ट' केली नसल्याचं स्पष्टीकरण सैफने एका परिपत्रकात दिलं आहे.
करिना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. 'आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही.' असं सैफने स्पष्ट केलं आहे. लंडनमध्ये बाळाला जन्म देण्याचा सैफ आणि करिनाचा इरादा असल्याचंही म्हटलं जात होतं, मात्र हा दावाही सैफने धुडकावून लावला आहे.
आम्ही आमच्या बाळाचं नाव 'सैफीना' ठेवणार नसल्याचंही सैफने ठणकावून सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वी बाळाच्या लिंगाबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर करिनाही भडकली होती. जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती. डिसेंबर महिन्यात करिनाला बाळ होणार असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement