एक्स्प्लोर
करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं
मुंबई : बॉलिवूडमधील प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर बाप झाला आहे. सरोगसीच्या मदतीने करणला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी अपत्यप्राप्ती झाली आहे. सरोगसीद्वारे सिंगल पेरेंट होणारा करण हा नजीकच्या काळातला दुसरा सेलिब्रेटी ठरला आहे.
करणने आपल्या मुलीचं 'रुही', तर मुलाचं 'यश' असं नामकरण केलं आहे. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवण्यात आलं आहे.
मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात 7 फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती आहे. मात्र महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही.
करण जोहरने यापूर्वी अनेक वेळा पिता होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यामुळे करण लग्न करणार असल्याची अटकळ बॉलिवूडसह तमाम चाहत्यांनी बांधली होती. मात्र सरोगसीच्या माध्यमातून सिंगल फादर होत करणने या सर्व चर्चांना छेद दिला आहे. भारतात 2002 पासून सरोगसी कायदेशीर आहे, मात्र आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणं बंधनकारक आहे.
गेल्या वर्षी अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला होता. त्याचा कित्ता गिरवत करण जोहरनेही आपली इच्छा पूर्ण केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement