एक्स्प्लोर
काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार
सिनेमात भूमिका मिळावी, यासाठी जिब्रानने करण जोहरला विचारणा केली होती.

मुंबई : 'कभी खुशी कभी गम' सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या जिब्रान खान मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याला भूमिका देण्यास नकार दिला आहे. खरंतर करण जोहरच्याच 'ब्रह्मास्त्र' सिनेमात जिब्रान खान काम करत आहे. परंतु यात ट्विस्ट असा आहे की, जिब्रान अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत नाही. तर या सिनेमात तो चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. सिनेमात भूमिका मिळावी, यासाठी जिब्रानने करण जोहरला विचारणा केली होती. पण तुझा चेहरा मॅच्युअर नाही. त्यामुळे काही काळ पडद्यामागे राहून काम करायला हवं, असं सांगत करणने त्याला भूमिका देण्यास नकार दिला. 'कभी खुशी कभी गम' नंतर करण जिब्रानचा मेंटर बनला आहे. करणनेच त्याला या सिनेमात शाहरुख-काजोलच्या मुलाची भूमिकेसाठी संधी दिली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























