Karan Deol Drisha Acharaya Reception : करण देओल आणि द्रिशा आचार्यचं थाटात पार पडलं रिसेप्शन! रणवीर-दीपिकासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी
Karan Deol Drisha Acharaya : अभिनेता करण देओल आणि द्रिशा आचार्य नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
Karan Deol Drisha Acharaya Reception : बॉलिवूड अभिनेता करण देओल (Karan Deol) नुकताच गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत (Drisha Acharaya) लग्नबंधनात अडकला आहे. मुंबईतील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर याच हॉटेलमध्ये धर्मेंद्र यांचा नातू करण आणि बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.
करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाच्या रिसेप्शन शाही थाटात पार पडलं आहे. हे रिसेप्शन कव्हर करण्यासाठी आलेल्या पापराझींना खास मिठाई देण्यात आली. या रिरेप्शनमधील धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडकरांची हजेरी
करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या रिसेप्शनला आमिर खान, सलमान खान, शत्रुघ्न सिन्हा, लव सिन्हा, राज बब्बर, जॅकी श्रॉफ, कपिल शर्मा, सुनील शेट्टी, अनुपम खैर, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या कलाकारांनी हजेरी लावत नवविवाहित जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
करण आणि द्रिशाच्या रिसेप्शन पार्टीत वत्सल सेठ आणि निकिता दत्ता, मुलगा आणि मुलीसोबत पूनम ढिल्लन, गदर फेम दिग्दर्शक अनिल शर्मा त्याचा अभिनेता मुलगा उत्कर्ष शर्मासोबत, दिवंगत अभिनेता अजितचा मुलगा शहजाद खान त्याच्या कुटुंबासह, चंकी पांडेचा भाचा अहान पांडे त्याच्या आईसोबत. डायन पांडे, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर अहमद खान त्यांच्या कुटुंबासह, दिग्दर्शक राजकुमार संतोषी त्यांच्या कुटुंबासह, दिग्दर्शक राजीव राय, दिग्दर्शक कुणाल कोहलीदेखील सामील झाले.
करण देओल आणि द्रिशा आचार्यवर शुभेच्छांचा वर्षाव (Karan Deol Drisha Acharaya Wedding)
करण देओल (Karan Deol) आणि द्रिशा आचार्य (Drisha Acharaya) 18 जून 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. त्यानंतर लगेचच त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. या रिसेप्शनमधील द्रिशाच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करण आणि द्रिशाच्या लग्नसोहळ्याचे आणि रिसेप्शनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते कमेंट्स करत दोघांना सुखी संसारासाठी शुभेच्छा देत आहेत.
संबंधित बातम्या