एक्स्प्लोर

Zwigato Trailer: कॉमेडियन कपिल शर्मा करणार पिझ्झा डिलिव्हरी! आगामी ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिलात का?

Zwigato Trailer: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) टीव्हीपाठोपाठ आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Zwigato Trailer: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) टीव्हीपाठोपाठ आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल त्याच्या ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील कपिलचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. यामध्ये तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसला होता. आता कपिलच्या या आगामी चित्रपटाचा शानदार ट्रेलरही रिलीज झाला आहे. या चित्रपटात कपिलची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.

लोकांना नेहमी खळखळवून हसवणारा कपिल शर्मा या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो आयुष्यातील अनेक संकटांना तोंड देताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा ट्रेलर :

आपल्या धमाकेदार कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा कपिल शर्मा या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. 'झ्विगॅटो'चे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. यात कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला.

काय आहे या ट्रेलरमध्ये?

या चित्रपटाच्या 1 मिनिट 39 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात एका बिल्डिंगपासून सुरू होतो, जिथे कपिल हा डिलिव्हरी बॉय बनून पिझ्झा घेऊन येतो. पण, अगदी सुरुवातीलाच एक सीन आहे, ज्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, डिलिव्हरी बॉयला इमारतीतील लिफ्ट वापरण्यास मनाई आहे आणि त्यामुळे तो जिने वापरून वर जातो. डिलिव्हरी बॉयच्या समस्या या सीनमधून सांगण्यात आल्या आहेत.

यानंतर, ट्रेलरमध्ये कपिल शर्माच्या कुटुंबाची झलकही दाखवण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी कपिल रात्रंदिवस काम करण्यास तयार आहे. असाच एक सीन ट्रेलरमध्ये येतो, जिथे कपिल म्हणतो की, आज मी 10 डिलिव्हरी करणार आहे. मात्र, जेव्हा कपिलची पत्नी शहाना देखील कामावर जायला सुरुवात करते, तेव्हा कुटुंबात नवीन वाद सुरू होतात. यानंतर सामान्य कुटुंबाप्रमाणे कपिलच्या घरातही वाद सुरू होतो.

काय आहे कथानक?

'झ्विगॅटो' ची कथा एका अशा अधिकाऱ्याची आहे, जो एका कंपनीत मॅनेजर आहे, ज्याची नोकरी साथीच्या आजाराच्या काळात गेली आहे. या काळात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो व्यक्ती डिलिव्हरी बॉयचे काम करू लागतो. या चित्रपटातून सामान्य डिलिव्हरी बॉयच्या समस्या मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget