एक्स्प्लोर

Kangana Ranaut : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याच्या 'त्या' दाव्यावर कंगनाचा संताप; स्पष्टीकरणही दिलं, म्हणाली, 'मी स्वाभिमानी हिंदू'

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत ही निवडणुकांच्या रिंगणात उतरल्यापासून अनेक गोष्टींमुळे चर्चेत येत आहे. नुकतच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

Kangana Ranaut on Vijay Wadettiwar : कंगना रणौतला (Kangana Ranaut) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Election 2024) मिळाल्यापासून ती कोणत्यातरी कारणामुळे बरीच चर्चेत येतेय. कधी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील वक्तव्यावरुन तर कधी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे, कंगनाला नेटकऱ्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागतंय. त्यातच पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाने नेटकऱ्यांना झापलंय. 

नुकतच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी कंगनाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कंगना बीफ खाते असा स्पष्ट उल्लेख करत वडेट्टीवारांनी कंगनावर निशाणा साधला होता. यावर कंगनाने ट्वीट करत स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यामुळे सध्या विजय वडेट्टीवार विरुद्ध कंगना असा वाद पाहायला मिळतोय. 

कंगनाने काय म्हटलं?

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, मी गोमांस किंवा कोणत्याही प्रकारचे केड मीट खात नाही. माझ्याबद्दल अशा निराधार अफवा पसरवल्या जात आहेत ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. मी अनेक दशकांपासून योगा आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रचार करत आहे आणि आता अशा डावपेचांनी माझी प्रतिमा  शकणार नाही. माझे लोक मला ओळखतात. त्यांना माहित आहे मी कशी आहे ते आणि मी एक अभिमानी हिंदु आहे. त्यामुळे कोणीही त्यांची दिशाभूल करु शकत नाही. जय श्री राम.

विजय वडेट्टीवारांनी काय म्हटलं?

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीमधील एका सभेतून कंगनावर निशाणा साधला होता. त्याचप्रमाणे भाजपकडून कंगनाला देण्यात आलेल्या उमेदवारीवरही त्यांनी टिका केली. कंगनावर बोलताना त्यांनी म्हटलं की, गोमांस खाणाऱ्या कंगना रणौतला भाजपने तिकीट दिलं आहे. यावर आता कंगनानेही तिचं स्पष्टीकरण दिलं असल्याचं पाहायला मिळतंय. 

अभिनेत्री कंगना रणौत हिला भारतीय जनता पक्षाकडून हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून कंगना राजकारणात येणार अशा चर्चा होत्या. पण तिला थेट लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचं पाहायला मिळतंय. 

ही बातमी वाचा : 

Tiger Shroff : 'तू अजूनही सिंगल आहे?' टायगरच्या उत्तरामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला माझी 'दिशा'...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:   8 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaWalmik Karad Beed : सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड शरण येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
Astrology : आज सोमवती अमावस्येच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
आज सोमवती अमावस्येला जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
Walmik Karad: मोठी बातमी: वाल्मीक कराड पोलिसांसमोर कधी सरेंडर होणार? महत्त्वाची अपडेट, बीडमध्ये घडामोडींना वेग
वाल्मीक कराड पोलिसांसमोर कधी सरेंडर होणार? महत्त्वाची अपडेट, बीडमध्ये घडामोडींना वेग
Maharashtra Weather: येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
Embed widget